भूतकाळात जगायला आवडतं अगदी तासंतास

तू माझ्या जीवनात असताना
जगण्यात एक वेगळीच मजा होती
अर्थातच आता सुध्दा आहे
पण आता ती शोधावी लागते
'एक मुलगी माझं जीवन नाही बदलू शकत'
हा खोटा ego prove करण्यासाठी
मग कधी कधी वाटू लागतं
मी शोधतोय ते entertainment आहे
खरी मजा तर तु होतीस तेव्हाच यायची
.
.


.
.
या सर्वात मग परत कधी कधी वाटु लागतं
मागावी तुझी माफी , का ? ते माहीत नाही पण मागावी......
मिळवावी तुझी मैत्री पुन्हा ,
अपेक्षा सोडून प्रेमाची, जी या आधीही कधीच नव्हती,
बोलत बसावं पुन्हा एकदा तासंतास ,
अन् खूप काही करावं ,फक्त तुझ्यासाठी...
पण ......
बोचऱ्या शब्दांनी बांधला गेलेलो मी,
तुझ्या सुखासाठी प्रार्थना करत
त्याच मैत्रीच्या वाटेवर जिथं
मला एकटंच सोडून गेलीस,
एवढंच करू शकतो ....