महाराष्ट्र म्हणजे वीरांचे बलिदान, महाराष्ट्र म्हणजे क्रांतीची मशाल, महाराष्ट्र म्हणजे इतिहासाचा जागर आणि महाराष्ट्र म्हणजे पराक्रमाची शौर्यगाथा. महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी, आणि परिवर्तनाची नांदी. महाराष्ट्र म्हणजे संस्कार संस्कृती आणि परंपरांनी ओतप्रोत भरलेला अमृत कुंभ. आत्मसन्मान स्वाभिमान, अभिमान, पराक्रम आणि बलिदानाचा यज्ञकुंड. महाराष्ट्र ही भुमी म्हणजे सह्याद्रीचे कवचकुंडल ल्यालेला स्वर्ग जणू. सह्याद्रीच्या या अभेद्य तटांनी महाराष्ट्राच्या मातीचे सदैव रक्षण केले. परकिय यवनांच्या वावटळीत सुध्दा ही महाराष्ट्राची लाल माती व येथील आकाशाला गवसणी घालणारे गिरीदुर्ग परकियांच्या आक्रमक आणि जुलमी अत्याचाराला समर्थपणे तोंड देत राहीले. याच लाल मातीत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे लाखों पराक्रमी योद्धे जन्माला आले, आम्ही म्हणूनच या मातीत हिंदवी स्वराज्य घडले. स्वराज्य जन्माला आले. मराठी मावळा ताठ मानेने उभा राहिला आणि स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर झाले. स्वराज्य जननी जिजाऊ आणि स्वराज्य संकल्पक राजे शहाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न, त्यांच्या मुलाने म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांनी साकार केले. छत्रपती शिवाजीराजे आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या शौर्याने व त्यांच्या महापराक्रमी लढवैया सहकार्यांमूळे ह्या हिंदवी स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर झाले. या महाराष्ट्राच्या मातीने भारतीय लोकांनाच नव्हे तर संपूर्ण जगाला स्वराज्य मंत्र दिला. स्वाभिमान आणि आत्मसन्मान जागृत केला, आणि म्हणूनच यवनांच्या जोखडातून मुक्त होऊन स्वतःचे, सर्वांचे, सर्वांसाठी, सर्वांकडून चालवलेले हिंदवी स्वराज्य जन्मास आले. छत्रपती शिवाजी महाराजांची ही स्वराज्याची संकल्पना पुढे भारताच्या राज्यघटनेची प्रेरणा बनली. या स्वराज्य प्रेरणेने शिवरायांनी मावळ्यांना देव देश आणि धर्मासाठी लढण्याचे बळ दिले. त्यामुळे आपली धर्मसंस्कृती जपली गेली. भारतीय सुपुत्रांनो एक लक्षात घ्या पहा आईच्या संकल्पासाठी शिवरायांनी एव्हढे मोठे साम्राज्य उभे केले. जमिन आपली समुद्र आपला, इथली नैसर्गिक साधनसंपत्तीही आपलीच, या सगळ्या गोष्टींचे उपभोक्ते पण आपणच असे सगळ्यांना ठासून सांगत हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे असा कानमंत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला. शेकडो वर्षे जूलमी धार्मिक अत्याचार, सांस्कृतिक अत्याचार, शारिरीक मानसिक अत्याचार असो कि महिलांवरील अत्याचार, या सगळ्यात जनता पिचून गेली होती. सामुहिक धर्मांतर केले जात होते. धर्मांतर न केल्यास हजारोंची सामुहिक हत्या केली जात होती, बायका मुलींवर जबरदस्तीने सामूहिक बलात्कार होत होते. हिंदूंनो तुम्ही काफिर आहात, मुसलमान व्हा किंवा मरणाला तयार रहा असं म्हणून हिंदूंच्या कत्तली केल्या जात होत्या. अल्लाने हे जग फक्त मुसलमानांसाठी निर्माण केली आहे तेव्हा या जगात फक्त मुसलमान राहतील असा मुस्लिमांचा कट्टरवाद इतरांचे अस्तित्व मान्य करत नाही. इतर सगळेच काफिर त्यांना एक तर मुसलमान करून घेणे नाही तर नष्ट करणे हे अल्लाने सांगितलेले पुण्याचे काम अशी मुस्लिमांची मान्यता होती व आजही आहे. हा धार्मिक कट्टरवाद तेव्हाही जगाला घातक होता आणि आजही तितकाच किंबहूना त्याहीपेक्षा जास्त घातक ठरतो आहे. आणि याच कट्टरवादातून शिवकाळापुर्वी व शिवकाळात देखील मुस्लिम राजवटीत बायका मुलींवर बलात्कार करून प्रदेशात बंदी बनवून नेत तेथे विकले जात होते. मंदिरात देव नव्हते, प्राचीन मंदिरे तोडली जात होती. धर्म बुडाला सगळीकडे अंधकार झाला असताना सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या शिवनेरी किल्ल्यावर प्रकाशमान सुर्य उदयास येत होता. सगळीकडे चैतन्य आणि मांगल्याचे वातावरण होते. सह्याद्रीच्या कातळ कडयांना आभाळ ठेंगणे झाले होते. दाही दिशा उजळून निघाल्या होत्या. गिरीदुर्गांच्या सभोवताली भिरभिरणाऱ्या वाराने मंगलवाद्ये वाजवायला सुरुवात केली अन् आसमंत मंत्रमुग्ध झाले. अशा या मंगल प्रसंगी शिवनेरीवर आई जिजाऊंच्या पोटी बाळ शिवबाने जन्म घेतला, शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज लहानपणापासून अतिशय कुशाग्र बुद्धीचे आणि एक न्यायप्रिय, शिस्तप्रिय, पण करारी स्वभावाचे होते. त्यांचा जन्मच जणू एका महान कार्याला प्रेरीत होता. ते हिंदू धर्म रक्षणासाठी अवतीर्ण झाले होते जणू शिवशंकराचा अवतारच तो. ते प्रचंड धर्माभिमानी होते. लहान वयात त्यांना आई जिजाऊंचे उत्तम शिक्षण मिळाले. आई जगदंबेची कृपा आणि आई जिजाबाई यांचे संस्कार यांचा परिपाक असा झाला की ते वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी हिंदवी स्वराज्याची घडी बसविण्यासाठी आपल्या बाळ सवंगडयासवे बारा मावळातील दर्या डोंगरात, गावे, वाड्या वस्त्यांमधुन मावळी लोकांसमोर शिवराज्य म्हणजे आपले हिंदवी स्वराज्य व्हावे यासाठी लोक संघटित करू लागले. त्यांच्या अमोघ वाणी आणि धाडसाचे कौतुक होऊ लागले व प्रस्थापित मातब्बर सरदार मंडळी बाळ शिवबाला प्रतिसाद देऊ लागले. नाडलेल्या जुलुमी अत्याचाराला बळी पडलेल्या मराठी मुलखात बाळ शिवबाच्या रुपाने आशेचा किरण दिसू लागला होता. वडिलांच्या जहागिरीवर काम करत असताना आई जिजाऊच्या मार्गदर्शनाखाली बाळ शिवबाने आपल्या सवंगडी मावळ्यांच्या सोबतीने व बुद्धी कौशल्याने एका बाजूला हिंदवी स्वराज्याचा घाट घातला. जिवलग मित्रांसवे रायरेश्वराच्या शिवमंदिरात बेलभंडारा उधळून  हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. शिवलिंगावर रक्ताचा अभिषेक घालूनच स्वराज्य स्थापनेची घोषणा केली. आणि तिथेच सुरूवात झाली बाळ शिवबाच्या पराक्रमाची. देव देश आणि धर्मासाठी अवघ्या पाच मुसलमानी पातशाहया अंगावर ओढून घेतल्या. त्यांना परास्त केले.......क्रमशः