ही गोष्ट आहे हेमाची. ती काल काहीशी उशिराने उठली. तिने डबा देखील बनवला नव्हता. रमेशचि अंघोळ उरकली तरी ती झोपूनच होती. रमेशला तेव्हा तिचा जरा रागच आला. जेमतेम आठवडा झाला होता त्याच्या लग्नाला. ही पोट धरून बसलीय. खरंच दुखतंय की असंच आपलं..?? असो ,जाऊदे रमेश स्वतःलाच विचाराच्या तंद्रीतून बाहेर दरवाजा धाडकन वाजवून पार्किंग कडे वळलो. दिवसभर कामाचा भयंकर लोड होता.दुपारी बाहेर जेवण करून रमेशने पुन्हा स्वतःला कामात गुंतून घेतलं. रात्री उशिरा पार्किंग मध्ये गाडी लावून रमेश घराकडे परतलला . सोलापूर शहरात ते दोघेच राहत होते . तो घराबाहेर उभा राहून डोरबेल वाजवली.
पण दरवाजा फक्त लोटलेला होता. अरे..!! त्याला जरा आश्चर्य वाटलं, ही अस तर कधी करत नाही.. त्याने पळतच बेडरूम गाठलं. ती बेड वर बसून शांतपणे कॉफी पित बसली होती. तो जरा घाबऱ्या स्वरातच तिला विचारलं ठीक आहेस ना..?? हेमा त्याच्याकडे पाहून - अ, … हो ठिके. कधी आलात तुम्ही. थांबा चहा बनवते. अस म्हणून ती हळूहळू चालत किचन कडे वळली. म्हणजे.. सगळं ठीक आहे. त्याने मोकळा स्वास सोडत फ्रेश व्हायला पळाला. पुढच्या मिनिटाला वाफाळता चहा तयार होता. बाल्कनी मध्ये उभं राहून तो हवेतला गारवा अनुभवत होतो. ती मात्र आज शांतच होती. स्वयंपाकाच्या तयारीला लागली असावी बहुतेक. किचन मधून भांड्यांचा आवाज यायला लागला.
तिने आवाज देऊन त्याला देवापुढे दिवा लावायला सांगितलं. का..?? रोज तूच लावतेस ना..?? त्याने तिला प्रतिउत्तर करत विचारलं..!! हो पण आज तुम्ही लावा. ती काहीश्या त्रासिक स्वरात म्हणाली. त्यानंतर जेवण देखील त्याच शांततेत झालं. तिचा चेहऱ्यावर त्रास स्पष्ट दिसत होता. काही दुखतंय का..?? चल डॉक्टर कडे जाऊ..!! त्याने तिच्या त्रासिक चेहऱ्यावर नजर रोखत विचारलं. ती मानेनेच नाही म्हणाली.. अग असं काय करतेस तू बोलली नाही तर मला कळणार कसं..? त्याने चिडुन विचारलं..काही नाही , तिने पुन्हा एकदा तसंच उत्तर दिलं.
जाऊदे असच मूड ऑफ असेल नाहीतर नसेल सांगायचं तर राहील.. त्याने स्वतःलाच समजावत जेवण उरकवलं. ती खूप उशीरराणे झोपायला आली. हेमा काय झालंय मला सांगशील का..? काही प्रॉब्लेम आहे का..? या वेळी मात्र रमेशला तिच्या अबोल्याचा राग आला. अहो काही नाही व लेडीज प्रॉब्लेम.ती काहीश्या ओकवॉर्ड आवाजात म्हणाली. रमेश ने सहज आवाजात विचारलं. म्हणजे पाळी आली का तुझी..?? मग त्यात काय एवढं, सांगायचं ना मला वाटलं दुसरं काही दुखतंय का काय..! ती पाय पोटाशी घेऊन झोपली. पण तिला उशिरा पर्यंत झोप लागली नव्हती. तिच्या सततच्या हलचालींमुळे रमेशला देखील झोप येत नव्हती. मात्र तो शांत होतो.
तासाभराने त्याने न राहवून तीला हाक दिली. हेमा..!! हम्मम, तिने पाठोपाठ मला ओ दिली. तो – खूप दुखतंय का ? नाही तिने दुखऱ्या आवाजात उत्तर दिलं..त्याने हळूच उठून गरम पाण्याची पिशवी आणली. तिच्या हातात देत पोटावर धरायला सांगितली. ती क्षणभर त्याच्याकडे पाहतच राहिली. त्याच्या हातातली पिशवी घेत तिने ती पोटाशी धरली. काही वेळातच तिला गाढ झोप लागली. त्यालाही जरा बरं वाटलं. आज सकाळी मात्र तिने लवकर उठून डबा बनवला. रोजच्या सारखंच आवरून दिल. जाण्याआधी देवापुढे दिवा लावायची देखील सूचना केली. या वेळी मात्र त्याने तिला आवाज देऊन विचारलं. पाळी आली म्हणून सांगतेयस का..?? तिने एका शब्दात उत्तर दिलं.. हो..!!
मला उशीर होतोय मी निघतो. आणि हो देवापुढे दिवा तूच लावशील, पाळी आली म्हणजे काही जगावेगळी गोष्ट घडली नाहीय…!! तो बोलत असताना ती त्याच्या चेहऱ्याकडे टक लावून पाहत होती. तिच्या डोक्यात काय चाललं होतं देव जाणे. तो मात्र ऑफिसला पळालो. आज ऑफिस वरून परतल्यावर तिने हसतच दरवाजा उघडला. आज ती थकलेली दिसत नव्हती. तशाच हसऱ्या चेहऱ्याने तिने त्याला चहा आणून दिला. बाल्कनीत काहीतरी विचार करत ती उभी होती. उत्सुकता म्हणून तोही तिच्या पाठीमागे जाऊन उभा राहिलो. त्याने विचारलं तरीही ती मनमोकळे पनाने त्याच्याशी बोलणार नाही हे ठाऊक होतं त्याला . कारण जेमतेम आठवडा झालेला त्यांच्या लग्नाला.
गावावरून आलेली ती तिच्यासाठी शहरी वातावरण आणि लग्न या दोन्ही गोष्टी नवीन होत्या. त्यांच्यात अजूनही हवा तसा संवाद घडलाच नव्हता. त्याला त्यांच्यात मैत्री व्हावी असं वाटत होतं. मात्र ती अजूनही त्याच्याशी घाबरून होती. आणि मी तिचा नवरा आहे मी जे सांगेल जस सांगेल तस वागणारी बायको म्हणून वागत होती. तिला कदाचित अजूनही हे वातावरण समजून घ्यायला वेळ लागत असेल. आपण घाई करणे बरं नाही या विचाराने तोही तिला वेळ देत होतो. बाल्कनीत तिच्या मागे उभा असताना मानेवर रुळणाऱ्या केसांकडे लक्ष गेलं. हलक्या वाऱ्यावर उडणारी एक बट तिच्या चेहऱ्यावरचं सौंदर्य अजून वाढवत होती.माहीत नाही का पण आज त्याला ती बट सावरण्याचा मोह झाला. पण अनाहूत भीतीने त्याने स्वतःला रोखलं. तिला कुठल्याही स्थितीत असुरक्षित वाटायला नको.
अजून काही दिवस तरी तिला या वातावरणाशी जुळवून घ्यायला लागतील. तो पर्यंत वाट पाहू.. तो बाजूला नजर फिरवत दूरवर पसरलेल्या सिमेंटच्या जंगलाकडे पाहत उभा होतो. आता त्याला नेहळण्याची वेळ तिची होती. हे मात्र मला जरा उशिरा लक्षात आलं. काय ग काय पाहते..?? त्याने हसून विचारलं. ती पुन्हा मानेनेच नाही म्हणाली. किती अबोल आहेस.., बोलत जा काहीतरी, मी एकटाच किती बोलणार..? शेवटी त्याने त्याची नाराजी व्यक्त केली. ती मान खाली घालून बराच वेळ काहीतरी विचार करत राहिली. एव्हाना त्याच्या कपातला चहा देखील संपला होता. तो आत गेल्या नंतर देखील ती तिथेच उभी होती. स्वतःचा कप हिसळून टाकताना ती त्याला किचनच्या दरवाज्यातून नेहळत होती. ये तू काय बघतेस ग..?? मला कळत नाहीय.. त्याला आता तिच्या बघण्या मागचं कारण जाणून घ्यायचं होत.
तुम्ही खूप छान आहात…!! ती खाली बघत गालात हसली..आता आश्चर्यानं बघायची वेळ त्याची होती. म्हणजे मला काही कळलं नाही..!! तुम्ही सकाळी टेबलावर ठेवलेल्या गोष्टी माझ्यासाठीच होत्या ना..?? हो..!! का ?? आवडल्या नाही का..?? त्याने त्याच समाधान म्हणून पुन्हा विचारलं..सकाळी ऑफिस ला जाण्याआधी खाली जाऊन तिच्यासाठी दोन तीन सॅनिटरी नॅपकिनचे पॅकेट, महिनाभर पुरतील असे शम्पो कंडिशनर, आणि खूप साऱ्या चॉकोलेट, आणि काही पेन किलर गोळ्या , अस काहीसं समान आणलं होतं. जास्त काही नव्हतंच त्यात मग हिला नेमकं काय आवडलं..?? तो काहीकाळ गोंधळलो. एक सांगू का..?? तिने त्याला विचारलं …हो सांग की..!!
आमच्या गावी ना आज पण त्या दिवसांत बाजूला बसण्याची प्रथा आहे. कधीच पाळी असताना कुठली शिवाशिव केली नाही. कितीही त्रास होत असला तरी घरातल्या पुरुषांना मात्र यातलं काही सांगायची सोय तर अजिबातच नाही. तुम्हाला सांगताना थोडा संकोच वाटत होता. पण तुम्ही किती सहजपणे याविषयी बोललात. त्या दिवसातला त्रास समजून घेतला. अजूनही आपली तितकीशी ओळख नाही. पण तुमच्या छोट्याश्या कृतीने आपण जवळ आलो.. थँक्स अस म्हणून चक्क ती त्याच्या कुशीत शिरली.. तिची अचानक भेटलेली मिठी म्हणजे जणू दुधात साखरेचा गोडवा होता. तो देखील पीघळलो. काही क्षण तो ही गोडवा अनुभवला.
त्याने तिला अजून घट्ट मीठीत ओढत म्हणाला . काय..? ती त्याच्या पाठोपाठ म्हणाली. माहितीये माझा बाबा हे पाच दिवस पाळतात .. ती त्याच्या चेहऱ्याकडे आश्चर्याने पाहायला लागली. त्याने हसून पुढे सांगायला सुरुवात केली. पाळतात म्हणजे वेगळ्या पद्धतीने. मी बारावीत गेल्या नंतर बाबाने मला ही गोष्ट समजून सांगितली. शेवटी निसर्गचक्र आहे. प्रत्येकालाच यातून जावं लागतं. काय बरोबर काय चूक हे ठरवणारे आपण कोण..? देवाने दिलं म्हणजे त्याहून सुंदर काय ..? बाबानी मला आईची काळजी घ्यायला सांगितलं, बाबा ही जमेल तसं आईसाठी करायचा. दर महिन्याचे ते पाच दिवस बाबाचे असायचे. बाबा त्या दिवसात स्वतःत स्वयंपाक करायचा आईला मुद्दामहून अराम करायला सांगायचा.
आईला फार छान वाटायचं. हळूहळू मीही स्त्रियांविषयी आदर करायला शिकलो. कित्येकदा ताईला देखील मी सॅनिटरी पॅड आणून दिलं. याने ना घरात एक मैत्रीपूर्ण वातावरण तयार झालं. कुठल्याही गोष्टीत तुम्हाला नाही कळणार अस म्हणणं बंद झालं.. मीही मोठा होताना गोष्टींचा सगळ्या बाजूने विचार करून वागायला लागलो. तुला बोलव अशी इच्छा होती. पण अजून आपल्यात छानशी अशी मैत्रीच झाली नाही.. आणि हो आता पुढचे 2 – 3 दिवस माझे असतील. तू अराम कर जमेल तितकी मी मदत करेल तुला.
ती त्याच्या छातीवर डोकं ठेऊन विसावली होती. आता त्याला जास्त समाधान वाटत होतं. कारण तिच्या स्पर्शात आता एक विश्वास जाणवत होता..!!
0 टिप्पण्या