*आयुष्यात आलेली वेळ....*

 

कोणावरही आलेली वाईट वेळ निघून जातेच पण जाताना चांगल्या चांगल्या लोकांच खरं रूप दाखवून जाते कपडे कितीही साफ व चकाचक असले तरी, वाईट आणि मळलेले चारित्र्य लपू शकत नाही. 

 


जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करा,  मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नसतात, म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा, काही वेळा माणसाची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होत असते, म्हणून शब्दाला धार नको आधार हवा, आयुष्यात एखाद्याला रडवून कितीही पूजा - पाठ  होम - हवन केले तरी काही एक फायदा होणार नाही पण जर रोज एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणले तर साधी अगरबत्ती सुद्धा लावायची गरज पडणार नाही.

 

कोणाच्या वाईट वागण्याने आपलं काहीही वाईट होत नसतं मिळतं तेच जे आपण पेरलेलं असतं आपल्याशी कोण कसही वागेना, आपण सगळ्यांशी चांगलंच वागायचं इतकं चांगलं की विश्वासघात करणारा ही पुन्हा जवळ येण्यासाठी तळमळला पाहिजे, संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रूबाब येतो आणि "रुबाब" हा विकत घेता येत नाही अन् दाखवता पण येत नाही.

 

तो व्यक्तिमत्त्वातून सिद्ध होतो ज्याचे कर्म चांगले आहे, तो कधी संपत नसतो, सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात. 

 

या उलट दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही परमेश्वरावर नेहमी नि:संकोच विश्वास ठेवा, योग्य वेळी तो इतकं देतो की, मागायला काही उरतच नाही. माणसानं कुंडीतल्या नाही तर जमिनीत लावलेल्या झाडासारखं असावं,कोणी पाणी घालेल या आशेवर राहून जळून जाण्यापेक्षा जमिनीतील ओलावा शोषून घेत मोठं व्हावं.

उंच उंच वाढत राहावं.