आयुष्य कसं जगावं कधी बसुन विचार केला का आता तुम्ही म्हणाल की बिना विचाराचं थोडी जगतो आहोत. आम्ही प्रत्येक काम विचार करूनच करत आहोत, होना .हो मला माहित आहे की प्रत्येक जण विचार करूनच आहे.पण मी असा विचार नाही म्हणत आहे. विचार तर सगळेच करतात .
पण तो त्या कामा संबंधित .मी हा विचार नाही म्हणत आहे. विचार केला का म्हणजे तुम्ही ठरवलं का की आयुष्य कसं जगावं. म्हणजे आयुष्याचा अभ्यास केला का. आयुष्याचा अभ्यास कधी केलाच जावू शकत नाही , कारण इथं कोणती वेळ कशी येईल हे सांगताच जात नाही .आपल आयुष्य किती आहे हे कोणालाच माहित नाही.आणि परत तेच्यात सुख दुःख चालूच राहते. कधी आपण खूप आनंदी असतो तर कधी आपण खूप दुखी असतो.आणि हे चालूच राहणार आहे.पण याच्या वेगळं आपण एक काम करू शकतो सांगू काय.आनंद घेणे , आपण प्रत्येक गोष्टीचा आनंद घेवू शकतो. प्रत्येक गोष्ट मग ती कशीही असो आपण तिला सुंदर बनवू शकतो आपल्या विचाराने .अस समजून चला की जे काही तुमच्या सोबत घडत आहे ते खूप छान आहे तुमच्या चांगल्या साठी आहे.मग त्या कोणाच्या शिव्या का असेना. हसू नका ही गोष्ट मी प्रत्येक्षात अनुभवलेली आहे. मी पण अशीच कधी सुखी तर कधी दुखी राहाायचो मग मी विचार केला की मी माझ्या परिस्थिती वर अवलंबून का राहू. मला आनंदी राहायचं की दुखी हे फक्त मी ठरवणार.काय होत जर आपल्या मनासारखं काही घडत नसेल तर , आता घडत नाहीं याचा अर्थ असा थोडी की कधी घडणारच नाही. आणि अस थोड कि जो विचार मी स्वतः साठी करतो की असच पाहिजे होत ते बरोबरच आहे. म्हणजे जे काही देव आपल्याला देत आहे मग ते आपल्या मना वेगळं का असेनापण ते आपल्या साठी चांगलं असू शकत.असा जर विचार केला तर बघा होत का दुःख. सुख आणि दुःख आपल्या विचारताच आहे म्हणून चांगला विचार करा आणि परिस्थिती कशीही असो आनंदी रहा.कारण आता पर्यंत त्यानेच परिस्थितीवर मात केली ज्याने तो प्रसंग आनंदाने पार पाडला .कारण जर आपण एकागोष्टी ने दुखी झालो तर अशा अनेक गोष्टी घडतात. त्यामुळे खूप खुप आनंदी राहा आणि मग अनुभव घ्या की सगळ तुमच्या मनासारखं होत का नाही म्हणून.