परवा मला वासू भेटला. नुकतीच थंडी चालू झाली होती. गुलाबी की काय म्हणतात तशी. त्या दिवशी बायकोने मला हलवून हलवून ८ वाजता ऊठवायला सुरवात केली. मी हालेना बघु तिने तोंडाचा पट्टा तो ही खर्जात चालू केला. शेवटी भिक नको कुत्र आवर या न्यायाने ऊठलो. चुळ भरली. केसावर हात फिरवत स्वेटर घातला. तर बायको कुचकुचली फक्त चार पावल जायच तर जामानिमा नको करायला. आता मी ही पेटलो मी आज डेरीतून ताज दुध आणणार आहे पिशवीच शिळ नाही कळल!तिने फक्त नाक मुरडल म्हणाली लवकर परता. . आज अजुन पहिला चहा व्हायचायं. मी चप्पल चढवल्या आणि त्याची फरफऱ करीत नाराजीनेच बाहेर पडलो. कोपऱ्यावरच्या डेरीतून दुध घेऊन निघालो तेव्हड्यात आवाज आला. . बंडोपंत तुम्ही. . वा. . आज वहिनींनी हाकललेल दिसतय. . आणि सात मजली हासला. मी रागाने त्याच्याकडे पाहिले पण माझा राग आश्चर्यात बदलला. . च्यायला वाश्या तू! आणि काय रे तुझा आवतार? ट्रॅकसुट वर जर्किन, कान टोपी, हातात मोजे, पायात स्पोर्ट शुज. . . मला थांबत तो म्हणाला बंड्या लेका मस्त गुलाबी थंडी पडतेय. या थंडीत व्यायामाने आपण एकदम फीट्ट रहातो. तुझी बघ ढेरी स्वेटरमुळे आणखी उठून दिसतेय. बर मी काय म्हणतो मस्त चहा पिऊ या. अरे नको उशीर होईल. ही बोंबलेल तिचा पहिला चहा व्हायचाय. . आणि. . सगळ काही माहिती आहे मला. वहिनींनी तुला मोजून पैसे दिलेत त्यामुळे चहा पाजायला तुझ्याकडे पैसे नाहीत. . डोन्टवरी मी पाजतो चहा चल. .  अरे दोन चहा घे आणि हो नो कटींग. . फुल ओ भी काचकी ग्लासमे कळलं. अरे बंड्या उद्या पासून तु पण ये की सकाळी वाॅकींगला. काय मस्त आणि फ्रेश वाटतं. . माहितेय!चहा पिता पिता म्हणाला. . अरे लेका ती सरिता. . तुझी ती. . ए काहीतरीच काय माझी कसली. . आणि मी चक्क लाजलो. वाश्याच तो फिसकन हासला. . म्हणाला माहित आहे मला वन सायडेड प्यार. . पण लेका आजुन ही मस्त दिसते रे. . अगदी चवळीची शेंग. . तर सांगायचा मुद्दा काय तर ती पण येते सकाळी वाॅकला. काय मस्त ट्रॅकसुट तो केसांचा बोनी का मोनी टेल हलवत आणि. . आ. . आ. . जाऊदे लेका. . येत जा ऍटलिस्ट नेत्र सुख रे. . ! बघ बाबा. . साला वाश्या चहा पाजून गेला पण माझी झोप. . भुक. . तान्ह. . सर्व सर्व हारवून गेला. त्याच नादात घरी आलो. आल्या आल्या बायकोच्या शिव्या आणि तोंडाचा पट्टा किती हा ऊशीर . . पण माझ लक्षच नव्हतं. बायकोने दिलेला बेचव चहा ढोसला. सर्व अन्हीकं पटापट संपवली. कपडे चढवले. बायकोने दिलेला नाष्टा गिळला आणि ऑफीससाठी बाहेर पडलो. आज माझ कुठेच लक्ष नव्हतं. मला डोळ्यासमोर फक्त चवळीची शेंग. . म्हणजे ट्रॅक सुटात ती बोनीटेल आणि ती वरखाली हलणारी. . . दिसत होती. कधी एकदा सकाळ होतेयं आणि मी ही वाॅकला जातोय असच झाल होतं. पाचला ऑफीस सुटल्या सुटल्या स्पोर्टच्या दुकानात गेलो. मस्त ब्लु कलरचा ट्रॅकसुट खरेदी केला. जर्कीन आणि मस्त कानटोपी घेतली आणि हो स्पोर्ट शुज आणि नविन स्वाॅक्स असे पाच हजार संपवले आणि सर्व जामानामा करुन घरी आलो. बायको म्हणाली हे काय? अग माझ पोट बघ सुटायला लागलयं. . हो का मी तेच सांगते ना. . लवकर ऊठा आणि हो तोंडावर थोडा कंट्रोल ठेवा. सारख आपल हे खा. . ते खा चालूच. मी आज काही न बोलता तिच सगळ मुकाट्यानं ऐकून घेतलं. जेवून लवकर झोपलो.  पण कसल काय रात्रभर ती डोळ्यासमोर बोनिटेल उडवत चालणारी आणि वर खाली छाती. . ती चवळीची शेंग. तरीही सकाळी लवकर जाग आली पटकन आवरल. नवा ट्रॅकसुट नवे स्वाॅक्स नवे स्पोर्ट शुज नवी कानटोपी आणि नवा जर्कीन सगळा जामानिमा करुन बाहेर पडणार तेव्हड्यात तिची हाक आली आहो थांबा मी पण येतेय माॅर्निंग वाॅकला. आता मात्र माझ स्वप्न खाडकन उतरलं. च्यायला अस काही होईल हे स्वप्नातही वाटल नाही. मेलं. .  तिच्या आयला. .  ते स्वप्न. . ती चवळीची शेंग. . ते. . आहो चला कुठे तंद्री लागलेय. . 


झोप येतेय का?
मी झटकन वळलो आणि बघतच राहीलो आपली बायको इतकी सुंदर दिसतेयं हे पहिल्यांदाच आनुभवलं. तिचा ही नविन ट्रॅकसुट होता. मस्त जर्कीन आणि हो तिची बोनी टेल ही. . काय मस्त दिसत होती. . 
आहो चला.  मी जागा होऊन तिच्या बरोबर निघालो. मैदानाच्या दारात आलो. तिथे ती म्हणजे सरीता. . ती चवळीची शेंग उभी . . माझ्या बायकोकडे हसत पहात म्हणाली सुमे अगदी वेळेवर आलीस आणि ह्या तुझ्या नवऱ्याला उचलून आणलस आश्चर्य आहे. मी चांगल ओळखते याला. काॅलेजमघ्ये स्पोर्टबिर्ट काही म्हटल की महाराज मागे. . आणि ती खळखळून हसली. . म्हणाली चला. . 
आता रोज आम्ही दोघ वेळेवर सकाळी घरा बाहेर पडतो ती ग्राउंडवर भेटते मग आम्ही वाॅक करतो. कधी कधी नंतर टपरीवर चहा पितो. कधी कधी वाश्याला पण चहा पाजतो आणि म्हणतो वाश्या तुझ्यामुळे लेका. . 
वाशा मात्र चहा पिताना आंबट तोंड करतो. . म्हणतो बंड्या तेरा हुवा लेकीन मेरा कब होगा. . बिचारा ब्रह्मचारी आहे ना. . !!