खर तर तू सोडून गेलीस त्याला खूप दिवस झाले. खूप म्हणजे खूपच. मार्च या महिन्यात वाढदिवस आहे  तुझा. हो ना  बघ तुझ्याबद्दलच्या अनेक गोष्टी, ज्या मी कधीच विसरणार नाही अस वाटल होत, त्याही आता पुसट झाल्या. एखाद अवघड दिसणार गणित, सोडवायला बसल्यावर मात्र लगेच सुटून जाव तस काहीस! मग अशा गणिताला अवघड म्हणायच की सोप? दिसायला अवघड म्हणून अवघड, की लगेच सुटणार म्हणून सोप? मुळात लगेच सुटणार गणित सोपच असल पाहिजे हे अनावश्यक गृहीतक तरी स्वतावर का लादून घ्याव? माहित नाही. पण हेच जर मला कोणी मी पूर्वी तुझ्यासोबत होतो तेव्हा विचारल असत, तर मी बेशक 'अवघड' अस उत्तर दिल असत.

असो.मी ही त्यातलाच. करंटा. चालायचच. प्रेमात माणस बदलतात हे वारंवार ऐकल होत. पण माझ नक्की काय झाल हे मात्र सांगण अवघड आहे. सोप्या शब्दात सांगायच म्हणजे मी संपलो. संपलो म्हणजे संपलो. उरलोच नाही. आता याला 'बदल' तरी कस म्हणायच? कारण बदल हा स्वरूपात होतो. होत्याच नव्हत होण्याला 'बदल' अस मवाळ नाव देण मला तरी पटत नाही. लोक म्हणतात 'बदललायस तू!'. मूर्ख लेकाचे साले. बघ, चिडणही वाढलय माझ आताशा. मन आणि बुद्धी, एकमेकांपासून पूर्ण स्वतंत्र होण म्हणजे काय, हे सध्या अनुभवतोय मी. कारण फालतू असत अगदी, हे बुद्धीला माहित असत माझ्या, पण मन मात्र संतापाने पेटून उठत. राग आवरत नाही. पूर्वी असा नव्हतो मी, हो ना? खर तर छातीठोकपणे, 'नाही' , अस म्हणू नाही शकणार मी. कारण स्वतावर इतका विचार आधी कधी केलेलाच नाही ना! तू गेल्यापासून हे ही वाढलय माझ. तासनतास आत्मचिंतन करत असतो. चिंतन कसल, आत्मनिर्भत्सनाच! त्रास होतो खूप, पण यातही एक गम्मत आहे. मला एक कळलय की मी एकाच वेळी खूप चांगला आणि खूप वाइट आहे. म्हणजे चांगुलपणाला घाम फुटेल इतका चांगला आणि वाइटाला वाईट इतका वाइट! बघ. भाषाही हल्ली बदललीये माझी. पूर्वीसारख खोल लिहिता येत नाही आता. लिहिल चुकून तर रडायला येत. उगीच. फालतूगिरी! विचारांचा गोंधळ होतो. उदाहरणही नसतात. म्हणजे असतात, पण याहूनही चांगली देता आल असत अस सारख वाटत. 

पण याचही काही आता विशेष वाटत नाही. तू गेलीस, आता लिहू तरी कोणासाठी? काही जण म्हणाले, स्वतासाठी लिही. मला तो मूर्खपणा वाटला. स्वतासाठी लिहिण्याची काय गरज? जे वाटत ते मनात एकसंध बडबडून पाहिल की झाल! हे मी खूप वेळा करतो. 

कोणाला सांगितल, तर म्हणतात तुला कामधंदे नाहीत म्हणून अस होत. म्हणजे लोक किती बावळट असतात बघ. एडिटिंग चे काम  संपल्यावरही नंतर 4-4 तास काम करत बसतो मी. बाहेर यावसच वाटत नाही.. असो. पण हे मनात येत न येत तोच तूही आठवलीस आणि मी एकदम अस्वस्थ होवून गेलो.

  खर तर अस आता वाटत. खरच प्रेम केल का ग मी तुझ्यावर? कदाचित नाहीच. म्हणूनच मी बदललो नसेन, कदाचित. नक्की माहित नाही. व्यसन होत तुझ मला. व्यसन हा शब्द कदाचित अवास्तव वाटेल तुला. असेलही. 'वास्तव म्हणजे काय' ? मुळात तुझ्यात नशा आहे हे तुला माहित आहे का? म्हणजे 

सतत तू सोडून जाशील की काय अशा भितीच्या सावटाखाली राहून कंटाळलो होतो मी. सतत तुझासाठी काहीतरी एक्सट्रा करण्याच्या वेड्या इच्छेने पेटून पेटून जळून गेलो होतो मी. आणि आता बघ. पेटायला माझ्यात काही शिल्लकच नाही. मुळात प्रेमात माणसाने शांत असाव, पेटू नये, हे आता पटलय मला. मुळात आपण कोणीच ज्वलनशील नसतो. आणि अशी गोष्ट जाळली की निघतो फक्त धूर.. आता तू तर बाजूला झालीस, पण याच धूरात मी मात्र गुदमरतोय. असूदेत. तक्रार नाही. खर तर धूर बाजूला करायला काय लागत? एका फुंकरीत जाइल उडून. पण मी स्वतालाच गाल न फुगवण्याची शिक्षा करून घेतलेली आहे. एक दिवस येइल असा, की मी स्वताच इतका चांगला होइन की कोणीतरी आपणहून फुंकर मारून हा धूर माझ्यासाठी बाजूला करेल. मी तोपर्यंत थाम्बायच ठरवलय. असल काही मी बाहेर बोललो की लोक मला वेडा  म्हणतात. मी हसतो. कधी कधी पटत त्यांच मला. मग रडतो. पण एक मात्र खर! आठवण तुझी खूप येते. अगदी सारखी. पण कोणास ठावूक, 

 मुळात तुझी आठवण येण्याइतक मी तुला कधी समजूनच घेतल नाहिए. असो. आणि एक सांगू? अवघड दिसणार गणित सोपही नसत आणि अवघडही! ते हवहवस असत किंवा नकोनकोस! ज्याना ते अवघड किंवा सोप दिसत ते लोक गणितापेक्षा, ते सोडवून मिळणार्या बक्षिसाकडे डोळे लावून बसलेले असतात. मी ही त्यातलाच. करंटा. चालायचच.


तुला  विसरण्यासाठी मन मारून जगणं, खूप कठीण असत एखाद्याला मानत दिलेली जागा ती पुन्हा रिकामी करण

त्या व्यक्तीला विसरणं किंवा ती नकोच म्हणून स्वतःला त्रास करून घेणं 

आपण का एवढा अट्टाहास करतो

 कारण आपल प्रेम कोणालातरी पसंद नाही म्हणून आपण का बदलायचं 

आपण का त्रास करून घ्याचा ? मी स्वतःच्या मनाला विचारलेला प्रश्न पण उत्तर मिळतच नाही,


ना विसरता येते ना त्या व्यक्तीशिवाय जगता येते

विचार करताना मनात खूप प्रश्न आले मुलगा म्हणून जल्माला येन किती कठीण असतं त्याला सगळी नाती जपावी लागतात  जसं मोठे होत जाऊ तसा सगळं विचार करावा लागतो आपल्यामुळे कोण दुखवेल का कोणता निर्णय घेताना आई वडील दुखावतील त्यांना त्रास होईल का

एखाद्याच्या प्रेमात पडलो तर तिला शेवटपर्यंत साथ देऊ का आणि द्याची असेल तर त्याला किती गोष्टीना सामोरे जाव लागलं हा विचार करायला भाग पडणे 

पण या अल्लड तरुण पणात केलेलं पहिले प्रेम ते कधीच विसरता येते नाही आणि त्या व्यक्तीला दिलेली जागा ही कोणाला देता येते नाही........... 🌹