"अवघे झाले जीर्ण शिर्ण,सुन्न झाल्या दही दिशा. खूप सोसले आता झाली,मुक माझी भाषा.." अशीच परिस्थिती आहे प्रत्येक स्त्रीची...सहन सुद्धा होत नाही आणि सांगता सुद्धा येत नाही...कल बदलला परिस्तिथी बदलली...काही प्रमाणात स्त्रीची सुद्धा... पण अजून सुद्धा काही ठिकाणी स्थिती तशीच आहे...मुलगी म्हणजे ओझ असं मानणारे लोक आजच्या २१ व्या शतकात सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात... असे एकही क्षेत्र नाही जिथे स्त्रियांनी आपले नाव कमावले नाही...अगदी भारताच्या राष्ट्रपती पदापर्यंत... तसं पाहिलं तर आपण महामाता जिजाऊंना मानतो, अहिल्याबाई होळकर यांना वंदन करतो...दुर्गा , महाकाली, महालक्ष्मी, जगदंेच्या चरणी नतमस्तक होतो..पण आपण किती जण स्त्रीचं अस्तित्व मानतो..?? स्त्रियांवर अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतेच आहे...प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात असं म्हणतात.... त्याप्राणेच काही बाबतीत परिस्तिथी बदलली नाही,तशीच काही प्रमाणत सुधारणा सुद्धा होत गेली...
स्त्री शिक्षण.. विधवा पुनर्विवाह..बल विवाहाला विरोध..सती प्रथेला सुद्धा विरोध केला गेला... घरातली स्त्री शिकली तर घर सुधारते या उक्ती प्रमाणे आजची प्रत्येक स्त्री शिक्षित आहे...प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे..समाजाला दिशा देते आहे...खरं तर स्त्रीचं निर्मिती आहे,तीच प्रकृती आहे,ती प्रवृत्ती आहे,श्रद्धा ,भक्ती आहे....प्रेम आहे.. माया आहे... मातृत्व आहे...स्त्रीचं दिशा असते...स्त्रीचं प्रगती आहे..ती असते म्हणूनच समाज असतो..घर असते आणि पर्यायाने देश सुद्धा... एवढं सगळं करून सुद्धा खरंच स्त्रीची दशा , परिस्तिथी सुधारली आहे का?चूल आणि मुल सांभाळणारी स्त्री घराबाहेर पडते आहे..घराला हातभार लावते आहे.... समाजातील वाईट विचारांन विरुद्ध लढते आहे..पण तिच्याच घरात तिला जागा , मान नसल्याचे दिसते... अन्याया विरुध्द लढण्यापेक्षा अन्याय सहन करण्यात धन्यता मानत असलेली स्त्री आज अन्यायाविरुद्ध लढते आहे...काही अंशी ही बदलाची जरी चांगली बाजू असली तरी सुद्धा राजस्थान ,हरियाणा,बिहार सारख्या राज्यात स्त्री शिक्षणाबद्दल नाराजी,मुलींच्या जन्माला विरोध,त्याच सोबत बालविवह सुद्धा होताना दिसतो...केरळ सारखं एखाद राज्य याला अपवाद असल्याचं पाहायला मिळतं... सध्याची परिस्थिती अशी आहे की काही ठिकाणी मुलींना लग्नासाठी विकले जाते अथवा विकत घेतले जाते.. हे जर असेच चालू राहिले तर मुलगी सासरी जाताना आई वडीलांना हुंडा मिळायची प्रथा सुरू झाली नाही म्हणजे मिळवलं...बंदिस्त आयुष्याने पीडित मुलीचा आज मोकळं श्वास घेत आहेत...धीराने समस्यांना सामोरं जात आहेत...त्या बदलत आहेत...विचारांनी प्रगत होत आहेत... आपण पाहतो की दुष्काामुळे अनेक शेतऱ्यांनी आत्महत्या केली पण कोणत्याही शेतकऱ्याच्या पत्नीने आत्महत्या केल्याचं आपण ऐकलं आहे का?,पतीच्या निधनानंतर सुद्धा सैनिक पत्नी आपल्या मुलांना खूप कष्टाने सांभाळतात...घर चालवतात...आपल्या मुलांना धीराने सैनिक बनवतात. ही असते स्त्री शक्ती.... ती बाळाला जन्म देते, त्याला धीराने मोठं करते,एक चांगला माणूस म्हणून घडवते..आजची खरी गरज पाहता तिला महाकाली च रूपा घ्यायला लागलं नाही तर नवल...स्त्री ही जशी सावरू शकते तशीच विस्कोट सुद्धा करू शकते..हे कधी तरी लोकांना समजेलच... आपल्याला सुशिक्षित म्हणवणारे सुद्धा स्त्री हत्या करताना दिसतात...परिस्तिथी बदलायला हवी असं नुसतं न म्हणता त्यासाठी काही तरी करण्याची गरज आहे हे लक्षात घेऊन आजच्या तरुण पिढीने पाऊल उचलायला सुरवात केली आहे. . खऱ्या अर्थाने समाज सुधारणेला प्रारंभ झाला आहे...स्त्री शिकली तर कुटुंब शिकत.. सुधारतं आणि पर्यायाने देश... sonography मशिनला tracker लावणे.. happy to bleed सारख्या कँपेन मधून जनजागृती करणे,rapist मुलींना नव्याने जीवन जगायला मदत करणे..ह्यासारख्या अनेक गोष्टीमुळे बदल घडायला सुरवात झाली आहे.. हे सगळं अजुन चांगल्या रीतीने घडू शकेल जर प्रत्येक मुलीने आपल्या असण्या बद्दल अभिमान बाळगला तरच...नमन करते मी आज प्रत्येक स्त्रीला ..तिच्यातला आईला...पत्नीला ... धन्य ती स्त्री...धन्य तिची अनेक रूपे... "नमन तुजला स्त्रिरूपे, वंदन तुजला मातृ रूपे, स्मरून तुझ्यातल्या तुला, प्रणाम करते आदर रूपे.."