प्रेम! खुप बोलता प्रेमाबद्दल तुम्ही मंग सांगा प्रेम काय असत?
तुम्ही कधी कोणावर खूप प्रेम केलंय का? केल तर का केल? नक्कीच सांगा!
वर मी विचारले प्रेम काय असत, प्रेम हे केवळ एक मुलगा मुलगी एकमेकांवर करतात तेच नाही. तर प्रेम हे एक पिता आपल्या लेकरांवर करतो, एक आई आपल्या लेकरांवर करते, एक बहीण भावावर करते, एक भाऊ बहीणी वर करतो, एक भक्त आपल्या दैवतावर करतो, एक नागरिक देशावर करतो, एक शेतकरी आपल्या शेतीवर करतो किंवा बरेच काही.....
जसे की सर्व व्यक्ती, प्राणी आपल्या जवळील विविध प्रकारच्या गोष्टींवर करतो हे पण प्रेमच आहे. पण आपण फक्त लफड ह्यालाच प्रेम म्हणतो. तसे का एका मुलीवर आई वडील आयुष्य भर प्रेम करतात तिला लहानाचा मोठ करतात खुप स्वप्न रंगवता. पण कस वाटत असेल त्यांना जेव्हा त्यांची मुलगी एक मुला करीता पळुन जाते. बापाची मान समाजात कायमची खाली करते. थोडा विचार करा, कीती दुःख होईल त्यांना.
हा जर तुम्ही प्रेम करता तर घरी सांगाना जर मुलगा योग्य असेल तर नक्की घरचे राजी होतील. पण ऐवढा मोठा निर्णय घेवु नका की आई वडीलांना जगन अशक्य वाटेल.
त्यांच्याही प्रेमाची थोडी कदर करा. आई वडीलांच ह्रृदय खुप मोठ असतं त्यांनी दीलेल्या मोकळीकचा फायदा कधी घेवु नका, काही निर्णय घेण्याचा त्यांचा अधिकार आहे तो तरी त्यांना पार पाडु द्या.
किती प्रयत्न असतात त्यांचे आपली मुलगी शिकली पाहिजे तिने समाजात चांगले स्थान मिळविले पाहिजे. पण मुली तर त्यांच्या आई वडीलांच स्थान पण समाजात खाली घालतात हे बरोबर आहे का बर. तुम्ही म्हणता ना प्रेमासाठी काही पण मंग आई वडिलांच्या प्रेमासाठी काय करता काहीच नाही ना. मंग निदान त्यांना नेहमी आनंदी ठेवण्याचे प्रयत्न तरी करा.
शेवटी ऐवढ म्हणेल आई वडिलांची इज्जत राखा व त्यांना योग्य निर्णय घेवु द्या.

0 टिप्पण्या