पावसाच्या सरीत

वाऱ्याच्या प्रवासात

उंचच उंच उडत गेलं

चिंब चिंब न्हालं

पुन्हा पुन्हा भीजलं

अभाळा संगे कोकिळे संगे

डोंगर माथ्यावर विसावलं फुलाला

पाहून मयूर सुखावला

फुलविला पिसारा सप्तरंग उधळले

लगेच इंद्रधनुष्य होतेच मागेच

हेलकावे खात फुल

मंदिरात गणेशाच्या चरणी गेलं

मनोमन फुल सुखावालं...