जीवन म्हणजे ... स्वतःच स्वतःला पडलेलं एक स्वप्न ||©||
ते आकाश पावलो - पावली सरकत होते माझ्याकडे आणि विचारत होते प्रश्न काही दुर्मिळ कड्या सारखे 🧗♂️
या पावलांना पसंद नसलेली वाट तुडवत तू कोठे जातो आहेस ? तू आहेस तरी कोण, तुझं नाव, गावं काही सांगशील का..?🤷
खरंतर या प्रश्नाचं उत्तर शोधायचा मी कधी प्रयत्नचं केला नव्हता आजवर..🤷♂ पण आज उत्तर शोधण्याची हुरहूर लागली होती.
ओठही आता थरथरू लागले होते आणि अंग ही चिंब होऊन जणू काही पाझरू लागलं होतं..🧖♂
सागराने सीमा ओलांडावी तशी, वादळे समोर थबकली, गहन विचारात प्रहर टळली,दुपार टळली आणि सायंकाळ ही सरली होती..🌚
रात्रही आता गाढ निद्रेत होती✨️नि चांदणे ही सर्वत्र आकारले होते, सर्वत्र शांतता पसरली होती नि पाखरांची कुजबुज ही थांबली होती..🙃
मी मात्र जागीच होतो, विचारांच्या विस्तीर्ण डोहात 😐नि स्वतःच स्वतःच्या प्रश्नाची उत्तरे शोधण्यात मग्न ...👨
मधेच माध्यरात्री कधी डुलकी लागली नि विचारांची घालमेळ जरा थांबली..तेव्हा अचानक कुणी तरी स्वप्नात येऊन काही तरी सांगून गेल्यासारखं वाटलं...🙄
ते अडखळते अस्पष्ट स्वर मला अजूनही आठवतात, ते असे होते..🤔
( जिवन... जीवन हे एक स्वतःच स्वतःला पडलेलं स्वप्न आहे आणि त्याच प्रतिबिंब म्हणजे आपण जगत असलेला प्रत्येक क्षण...)😍🖤💯🤷♂✍️
0 टिप्पण्या