सर्व चराचराला व्यापून उरते ती जाणीव.जाणीव असेल तर जीवनाला अर्थ आहे.आपण नेहमी हा शब्द ऐकतोजाणीव नाही हो कितीही करा. सगळ फुकट आहे.असे सुस्कारे सोडून म्हणले जाते. पाच पन्नास वर्षाच्या आयुष्यात थोडफार करावं लागले तर नाराजीचा सुर असतो. मनात विचार येतो हा निसर्ग आपल्यासाठी किती अन् काय काय सहन करतो?हजारो वर्षे पृथ्वी आपले भरण-पोषण करीत आहे. वृक्ष फळा फुलांनी बहरून येत आहेत. प्राणी पक्षी आपली सेवा निरपेक्षपणे करत आहेत.
मनुष्यप्राणी हा एक निसर्गाचाच भाग असून सुद्धा त्याला त्या निसर्गातील कोणत्याही गोष्टींची जाणीव राहिली आहे का? प्रगतीचा हव्यास स्वार्थाचा कडेलोट यामुळे सगळे जीवन उद्ध्वस्त करून टाकले हा त्यांच्या हा मानवी जीवनाचा रोजचाच नित्यक्रम आहे.मानवी जीवनातही खरे साधू संत, सज्जन, प्रामाणिक माणसानं बाबत आपल्याला किती जाणीव असते? ही जाणीव लहानपणापासून विकसित व्हायला हवी. लहानपणीचआपल्याला जे मिळते त्याविशियी जाणीव करून द्यायला हवी.थोर विभूती हे दुसऱ्यांसाठी का काम करतात? त्यांचा वेळ जात नाही? त्यांना बुध्दी नाही.?असं नसत, त्यांची जाणीव इतरांपेक्षा प्रगल्भ असते. ते चौकटी बाहेर जाऊन विचार करतात.त्यांना ध्यास असतो उत्तमोततम गोष्टींचा.त्यांना वाटत असते सर्वांनी सुखी असावे.सर्वांना आनंद मिळावा. त्यासाठी आपला सुख जीव दुःखात घालतात.जन्मभर हाल अपेष्टा सहन करतात.जगाच्या दृष्टीने ही माणसे वेडी असतात. आपण हे लक्षात ठेवायला हवे.हीच वेडी जगावर राज्य करतात.बाकीचे उंबरातले किडे चटोरे उंबरी करिती लिला. जेवढं आपल आपल्या पुरते तेवढे आपल जीवन संकुचित. आणि जाणिवेचा अभाव. शास्त्रज्ञ कोणतीही देशाचा असलातरी शोधाचा वापर जगभर असतो. विद्वान सर्वत्र पुज्यते. म्हणूनच जाणीव जेवढी तरल, विस्तृत , तेवढं जीवन समृध्द.शुद्ध जाणीव व विचार असलेले नेहमी खरे सुखी व समाधानी असतात. त्यांना द्यायचेच असते. अशी माणसेजग बदलवतात.आज जी काही प्रगती झाली आहे भौतिक अथवा कोणतीही ती केवळ अशाच माणसांच्या मूळे. मी माझे विसरल्यवरच . अशी माणसे सांख्येने कमी असतात.पण त्यांचे सामर्थ्य त्यांची जिद्द खूप मोठी असते.त्यांचा आनंद दुसऱ्याच्या आनंदात असतो. त्यासाठी विश्व त्यांचे घर, भूक त्यांची सोबत,निर्धार आणि निश्चय त्यांचे साथीदार.मरणही हसत स्वीकारतात.आपणहून सत्याच्याआग्रहासाठी विषाचे प्याले पचवतात बंदुकीच्या गोळ्या झेलतात, पण संकुचित विचारांचे बीज पसरू देत नाहीत.आपण सर्व सामान्य माणसांनी अशांना ओळखण ही देखील जाणीव च आहे सर्वांच्यात हे महान असण्याच सामर्थ्य नसेल पण ओळखता तर यायला हवं.शिवजी नाही होता येणार सर्वांना पण मावळा तरी होण्याचे भाग्य मिळवायला काय हरकत आहे.?एवढी जाणीव झाली तरी पुरे खूप काम होईल. सर्वांना आनंदात राहता येईल.अशी जाणीव सर्वांना लाभू दे हीच सदिच्छा....
0 टिप्पण्या