😀😃😄😁😆😅😂🤣☺️😊😇🙂🙃😉😌😍🥰😘😗😙😚😋😛😝😜🤪🤨🧐🤓😎🤩🥳😏😒😞😔😟😕🙁☹️😣😖😫😩🥺😢😭😤😠😡🤬🤯😳🥵🥶😱😨😰😥😓🤗🤔🤭🤫🤥😶😐😑😬🙄😯😦😧😮😲🥱😴🤤😪😵🤐🥴🤢🤮🤧😷🤒🤕🤑🤠😈👿
आपल्या शाळेच्या, कॉलेजच्या किंवा कुठल्याही ग्रुपवर एखाद्या विनोदाचा मेसेज येतो आणि आपण तो मॅसेज वाचून एकदमच खळखळून अक्षरशः डोळ्यात अश्रू येईल इतकं हसत राहतो. पण मित्रांनी मेसेज पाठवलाय आणि त्याला आपण नुसतं ‘हा.. हा..!’असा हसण्याचा मेसेज केला तर त्या मेसेज मधून मित्राला आपण इथे अगदी डोळ्यात अश्रू येईपर्यंत हसलोय हे कळणारच नाही. पण जर त्याच्या मॅसेजला उत्तर म्हणून आपल्या हावभावाप्रमाणे एखादा इमोजी पाठवला तर? त्या मित्रालाही आपण इथे किती हसलोय हे कळेल आणि तो ही आपल्याला पुन्हा-पुन्हा असंच हसवण्यासाठी मॅसेज पाठवत राहील. म्हणजे बघा ना! केवळ एका इमोजीमुळे दोघांच्याही संभाषणात किती फरक पडला. एका साध्यासुध्या मॅसेजला जणू भावनांची फोडणीच दिली गेली.
१९९९ मध्ये जपानी लोकांचा सामाजिक व्यवहार अधिक सोप्पा व्हावा म्हणून जपानच्या मोबाईलमध्ये हे इमोजी टाकण्यात आले. "शिगोताका कुरिता" यांनी या इमोजीला सर्वप्रथम जन्म दिला. जपानी भाषेतल्या इमोजी या शब्दाचा अर्थ आहे. 'इ' म्हणजे चित्र आणि 'मोजी' म्हणजे अक्षर किवा चिन्ह. शिगोताका कुरिता हे जपानच्या सर्वात मोठ्या मोबईल कंपनी 'डोकॉमो'साठी काम करत होते. इमोजी म्हणून सर्वात आधी त्यांनी हवामान, ट्रॅफिक, टेक्नॉलॉजी आणि चंद्र या चिन्हांची वेगवेगळी रूपं वेगवेगळ्या इमोजीत बनवली. लोकांमध्ये ही चिन्हं म्हणजेच हे इमोजी खूपच लोकप्रिय झाले. या चिन्हांमुळे डोकॉमो कंपनीला अधिक फायदा होऊ लागला. बाजारात डोकोमोची मागणी वाढली. त्यामुळे डोकोमोला होणारा फायदा पाहून मोबाईलच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांनीही अशीच वेगवेगळी चिन्हं बनवली.
एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला जेव्हा मोबाईल आणि संगणकाचा अधिक वापर होऊ लागला होता, तेव्हा मोबाईल कंपन्यांनीही आपल्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर या चिन्हांचं म्हणजेच इमोजींचं एक स्थान निर्माण केलं. पण त्यावेळी अडचण ही होत होती की, त्यावेळी संगणक हे केवळ आकड्यांवर चालत होते. त्यामुळे प्रत्येक अक्षर किंवा कॅरॅक्टर हे इनकोड केलेल असायचं. म्हणजेच ते काही आकड्यांच्या कोडने जोडलं गेलेलं असायचं. युनिकोड येण्याआधी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कोडींगची प्रणाली होती, त्यामुळे एक इमोजी हा वेगवेगळ्या माध्यमांवर वेगवेगळा दिसायचा. २००९ मध्ये ॲपल कंपनीच्या दोन इंजिनियर्सनी जवळ जवळ ६२५ नवे इमोजी बनवले आणि ते इमोजी युनिकोडमध्ये बसवण्यासाठी त्यांनी अर्ज केले. त्या अर्जाला लगेचच २०१० मध्ये मंजूरी मिळाली त्यामुळे प्रत्येक कंपनीच्या संगणक, मोबाईलमध्ये हे इमोजी अगदी मानाने वेगवेगळे चेहेरे करून बसलेले दिसतात. आणि सगळीकडे एक इमोजी हा एकसारखाच दिसतो. २०११ मध्ये ॲपल कंपनीने आय.ओ.एसमध्ये ऑफिशिअल इमोजी कीबोर्ड जोडलं तेव्हा जवळजवळ दोन वर्षांनी अँन्ड्रॉईड कंपनीनेही असंच कीबोर्ड आपल्या मोबाईलमध्ये वापरायला सुरुवात केली. कीबोर्डच्याच निर्मितीमुळे आता लोकांना त्यांचे इमोजी एखाद्या ठिकाणाहून कॉपी पेस्ट न करता स्वतःच्या कीबोर्डवर सहज वापरता येतील असे मिळू लागले.
‘युनिकोड कनसर्शन’ नावाची एक इमोजीची जागतिक संस्था इमोजीसाठी कार्यरत आहे. या संस्थेमार्फत दर वर्षाला नवे इमोजी बनवले जातात. या संस्थेनेच २०१५ मध्ये लोकांना हे इमोजी आपले वाटावे म्हणून लोकांच्या त्वचेच्या रंगावरून इमोजी तयार केले, त्यामुळे प्रत्येकाला आपल्या त्वचेच्या रंगाप्रमाणे असणारे हे इमोजी सामाजिक माध्यमावर वापरण्यासाठी अधिकच आपलेसे वाटू लागले. जगभरात लोकांमध्ये संवादासाठी वापरल्या जाणाऱ्या या इमोजीचं वेड आणि त्यामध्ये होणारी प्रगती पाहून २०१४ पासून १७ जुलै हा दिवस जागतिक इमोजी दिवस म्हणून साजरा केला जातो. जगभरात लोक दिवसभर जवळजवळ ५ अब्जापेक्षा अधिक इमोजी एकमेकांना पाठवतात. चेहेऱ्यावर येणारं हसू आणि डोळ्यातून निघणारं पाणी 😂- हा इमोजी जगभरात सर्वात जास्त वापरला जातो. त्या पाठोपाठ डोळ्यात प्रेम असणारा इमोजी 😍, नमस्कार करणार 🙏 इमोजी आणि ओठापाशी दिल असणार 😘 इमोजी लोक अधिक वापरतात असं मत इमोजी अभ्यासक मांडतात. मात्र नुकत्याच केलेल्या अभ्यासातून ही गोष्ट समोर येते की, २०२० ते २०२१ च्या अखेरपर्यंत लोक औषधे, हॉस्पिटल, डॉक्टर असे इमोजी अधिक वापरताना दिसले. आज इंटरनेटवर ही असे अनेक युट्युबर आहेत जे अनेक इमोजींचा अर्थ आपल्याला समजावून सांगताना दिसतात.
आज पूर्ण जगात या इमोजीचं फ्याड पसरलेलं आहे. आज लोकांना सामाजिक माध्यमांवर किंवा कोणा एका व्यक्तीशी चॅटिंग करताना केवळ शब्दांनी व्यक्त होणं अवघड वाटतं. एक इमोजी वापरला तरीही त्या व्यक्तिला नक्की काय म्हणायचं आहे, हे आपल्यालाही कळतं. आजच्या इमोजीच्या जगात आपल्या मनातलं बोलायला कदाचित शब्द अपुरे पडतील पण हे इमोजी कधीच कमी पडणार नाहीत. तर कशी वाटली ही इमोजीची माहिती नक्की सांगा! आणि हो, तुमचा आवडता इमोजी कुठला हे सांगायला विसरू नका.

0 टिप्पण्या