आत्मविश्वास वाढावा म्हणून बर्‍याच गोष्टी आपण करतो तर त्या करत असताना बऱ्याचदा असं लक्षात येतं की आपल्या ला काही गोष्टींची भीती वाटत असते आणि त्यामुळे आत्मविश्वास कमी होत असतो. आता हे आपल्याला माहिती नाही असं नाही माहिती आहे.पण आपण ती भीती कमी करण्यासाठीही ठरवून प्रयत्न करत नाही आणि मग त्याचा आपल्याला त्रास होतो आपण बऱ्याचदा काहीतरी कारण देतो आणि ती गोष्ट करायचे टाळतो ती भीती कमी करण्यासाठी आपण खरं तर काहीतरी कारण देतो. आणी त्या कारणा मागे लपतो,ऐकायला थोडंसं स्पष्टपणे बोलल्या सारखं वाटेल पण बऱ्याचदा आपण कारणं देत राहतो कुठल्या ना कुठल्या गोष्टीची आणि काही वेळा ती इतकी सवयीचं झालेलं असतं की आपण कारणे देतो आहोत आणि आता आपण मागे पडतो आहोत हे आपल्या लक्षातच येत नाही. आता दर वेळी आपली चूक असते असं नाही,शारीरिक व्याधींमुळे किंवा मोठ्या प्रकारचे मानसिक ताण असतात त्यामुळे होऊ शकतो पण रोजच्या जगण्यात आपण जरा आठवून पाहिलं तर आपण बर्‍याचदा कारणे देतो अगदी छोट्या गोष्टीतही आपण आपली चूक कबूल न करता ती दुसऱ्याच्या मुळे झाली असं सांगत असतो तिथे सुद्धा आपण काही गोष्टी स्वीकारत नाही आणि ज्यावेळी आपण ह्या गोष्टी स्वीकारायला लागू त्यावेळी आपला आत्मविश्‍वास वाढेल बऱ्याचदा आपला अपमान होईल,आपली खिल्ली उडवली जाईल,आपल्या मागे आपल्या विषयी नकारात्मक बोललं जाईल किंवा आपल्याला टोमणे मारले जातील पण आपलं मानसिक आरोग्य काही वेळा चांगलं ठेवण्यासाठी काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात.
     त्यातली एक गोष्ट म्हणजे एखादी गोष्ट जर आपल्याला जमत नाही आपण करणं सोडणार आहोत तर ती न घाबरता आपल्या आजूबाजूच्या माणसांना सांगायची.त्यावेळी कोण काय म्हणेल असा विचार करायचा नाही आणि कोणी काही म्हटलं तर त्याचा मानसिक त्रास करून घ्यायचा नाही, कारण आयुष्यभर त्या गोष्टीचा त्रास सहन करत बसण्यापेक्षा ती गोष्ट न केलेलीच बरी कुठलीही गोष्ट नाकारताना आपल्यात ती कपॅसिटी खरच नाहीये की आपण फक्त टाळण्यासाठी ती करतो आहोत याचा विचार करायचा. 
   बर्‍याचदा मला कोणीही सपोर्ट करत नाही म्हणून मी मागे पडलो किंवा पडले त्याचबरोबर मला खूप काही करून दाखवायचं होतं पण काही परिस्थिती नव्हती म्हणून मी करू शकलेलो नाही त्याचबरोबर मला नाही समजून घेतलं गेलं नाही त्यावेळी म्हणून मी हे करू शकले नाही किंवा करू शकलो नाही. किंवा माझी इच्छा कोणी विचारातच घेतली नाही. मला माझ्या सोबत कोणीतरी लागतं तर मी एखादी गोष्ट करू शकते किंवा शकतो त्याच बरोबर मला सतत कुणीतरी मोठी भेट करायला हवं असतं ही सगळी कारणं झाली.जर आपण ती गोष्ट करू शकणार नाही, हे आपल्या लक्षात आलं तर त्याच्या सारखी दुसरी गोष्ट आपण करू शकतो किंवा खरं तर या गोष्टीने आपल्याला बरं वाटणार आहे,आपलं मन रमणार आहे असा जर विचार मनात असेल तर तशीच मन रमणारी दुसरी गोष्ट आपण नक्कीच करू शकतो. मुळात कारणे देणे ही मानसिकता जर झाली असेल तर ती आपल्याला बदलायची आहे हे लक्षात घ्यायचे.
   आपलं मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आपल्याला ठरवून आनंदी आणि उत्साही रहावं लागेल. आणि आपण उत्साही आनंदी असलो तरच आपल्या आजूबाजूची माणसं असतील. काहीवेळा घटना अशा घडतात की त्यामुळे आपल्याला त्या वेळेपुरता मानसिक त्रास होईल पण,त्यात जास्तं अडकून न राहता आपण प्रयत्न करायचा त्यातून बाहेर पडायचं,त्यामुळे स्वतःचा विचार करायचा पण तो करत असताना सेल्फिश व्हायचं नाही इतरांना उगीचच उलट उत्तर देणं, आपल्यासाठी वेळ काढताना जिथे गरज आहे तिथेही दुर्लक्ष करणं मग ती अगदी आपली तब्येत का असेना अशा गोष्टी जर आपल्याकडून होत असतील तर आपल्याला त्या गोष्टीचा त्रास वाटेल आपल्याला त्यातुन आनंद मिळणार नाही.त्यामुळे आपल्या बरोबरच आपल्या घरच्यांचा आपल्या ऑफिसमधल्या लोकांचं मानसिक आरोग्य छान ठेवण्यासाठी आपण उत्साही असणं आणि आपल्यासाठी थोडा वेळ देणे गरजेचे आहे आणि म्हणूनच रोज मनापासून मनासाठी नक्की काहीतरी करा.