योग म्हणजे तनापासून मनापर्यंत आरोग्यास जोडणारा दुवा...फार पूर्वीपासून आरोग्याचं आणि योगच अनन्यसाधारण महत्व आपल्या प्राचीन संस्कृती मध्ये आहे .योग हे प्रचंड विराट शास्त्र आहे. जे की मनाचे तसेच शरीराचे नानाविविध समस्या सोडवण्याचा प्रयत्न करते.
आताच्या ह्या धकाधकीच्या जीवनात मनाला लगाम घालण्यासाठी योगा सारखे कोणते शास्त्र ही नाही आणि शस्त्र ही नाही. स्वतः ला स्वतःची ओळख करून देणारा कृष्णसारखा संवंगडी म्हणजे योग.
आयुर्वेद इतकचं योग अत्यंत महत्वाचा पैलू आहे...
योग म्हणजे " युज्यतेअनेन इति योग: I"
जो आत्मा आणि परमात्मा ह्यांना एकत्रित करतो त्यास योग संबोधतात.
जो योगाचा नियमित सराव करतो त्यास " योगी "संबोधतात.
योग प्रयोजन असे आहे की "योगो मोक्ष प्रवर्तक ".
मोक्ष प्राप्ती घडविणारा कर्ता.
मनुष्य जीवनामध्ये अत्यंत महत्वाचे चार ध्येय म्हणजे "पुरूषार्थ चतुष्टय" १.धर्म २.अर्थ ३.काम आणि ४.मोक्ष
हे वरील मानवी जीवनातील चार धेय्य प्राप्त करण्यासाठी मदत करतो तो ' योग ' .
ऋग्वेद ,यजुर्वेद तसेच भगवत गीतेत योगाचा संदर्भ आढळतो.
ज्यांनी योग ह्या शास्त्राची सगळ्या जगाला ओळख करून दिली ते म्हणजे ' पांतांजली' . त्यांस फादर ऑफ योगा असे म्हंटले जाते.योगचा शास्त्रीय संदर्भ ' पतंजली योगसूत्र 'मध्ये आढळतो.
आरोग्याच्या दृष्टीने पहावयास गेल्यास योगासारखे अमृत ह्या भूतलावर सापडणे मुश्किल....!
स्वतः ला स्वतःची ओळख करून घेवून आपली कुवत जाणून त्या दृष्टीने पुढील प्रयास करण्यासाठी योग अत्यंत उत्कृष्ट साधन आहे..
योगामुळे होणारे अगणित लाभ आपण पाहू ही शकतो आणि अनुभवू ही शकतो..
स्वतःच्या मनाला अस्थिरपणातून स्थिर करण्यासाठी आपण सर्वांनी काही मिनिटांचा वेळ स्वतःसाठी काढायलाच हवा..
शारीरिक तसेच मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी योग म्हणजे संजीवनी आहे अस म्हणायला गेलं तरी वावग ठरणार नाही.

0 टिप्पण्या