तुम्ही रोमॅंटिक आहात की नाही, हे कदाचित तुम्ही सांगू शकाल पण तुम्ही आणि तुमचा पार्टनर कोणत्या प्रकारचे रोमॅंटिक कपल आहात, हे तुम्हाला माहितीये का? आपण आपल्या जोडीदारासोबत आणि इतर लोकांमध्ये असताना कसे वागतो, यावरून आपला रोमॅंटिकपणाचा प्रकार ठरतो. या लेखात जाणून घेऊया की नक्की तुम्ही कोणत्या प्रकारचे रोमॅंटिक आहात.


खुल्या मनाने वागणारे  -

काही जोडपी आपल्या मनातील प्रेम अजिबात आडकाठी न ठेवता एकमेकांना नेहमी बोलून दाखवतात. एकमेकांची स्तुती जरी करायची असेल तर ते अगदी मोकळेपणाने करतात. प्रियकराबद्दल एखादी गोष्ट आवडली नाही तरी त्याच्या तोंडावर ती सांगितली जाते. अशी जोडपी अगदी चारचौघात सुद्धा न लाजता आपल्या जोडीदारावर भरभरून प्रेम करतात. म्हणजेच जोडीदाराला जवळ घेऊन त्यांना मिठी मारणे, बाबू-शोना म्हणत आपल्याला कोण काय म्हणेल याची पर्वा न करता जगजाहीरपणे एकमेकांवर प्रेम बरसवणे त्यांच्यासाठी सामान्य असते.


जोडीदाराचे ऐकणारे -

काही जोडपी अशी असतात जी प्रेमात पडल्यावर आपला जोडीदार जे म्हणजे किंवा सांगेल त्या प्रत्येक गोष्टीला मान हलवतात. आपला जोडीदार नाराज होऊ नये म्हणून त्याच्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी होऊ द्याव्यात म्हणून तो जे विचारेल त्याला आपलं हो म्हणून मोकळे होतात. अशामुळे नात्यात भांडणे तर होत नाहीत पण एकाला आपल्या मनाप्रमाणे नात्यात जगता येत नाही. दुसऱ्याला खुश ठेवण्यासाठी यामध्ये एक जोडीदार आपल्या इच्छांचा त्याग करत असतो. पण, असे असताना सुद्धा आपल्या जोडीदाराच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून त्यांना ख़ुशी मिळते.


हक्क गाजवणारे -

प्रेमात एकमेकांवर हक्क गाजवून रोमान्स करायला जोडप्यांना खूप आवडते. ही व्यक्ती फक्त आपली आहे, हे म्हणण्यात जे सुख त्यांना मिळत त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. त्यामुळे आपल्या जोडीदारावर हक्क सांगत त्याच्यासोबत रोमँटिक नात्यात राहताना दोघांना त्या नात्याचा गर्व वाटतो.



अबोल राहून व्यक्त होणारे -
प्रेमात प्रत्येक गोष्ट बोलायलाच पाहिजे असे काही नसते. काही प्रेमी बऱ्याचवेळा गोष्टी न बोलता सुद्धा आपल्या देहबोलीतून त्या दाखवत असतात. तुम्ही घातलेला ड्रेस जर तुमच्या प्रियकराला आवडला असेल तर तो लगेच तुमची वाहवा करणार नाही. पण तुम्हाला पाहताक्षणी एक मनापासून छान स्माईल तुम्हाला देईल. अशा प्रियकराचे प्रेम तुम्हाला समजून घ्यावे लागते. रोमान्स करण्याचा त्याचा अंदाज जरी हटके असला तरी तो सगळ्यांपेक्षा नक्कीच भारी असतो.



दिखावा करणारे -
काही जोडीदार असे असतात ज्यांना आपले प्रेम सगळ्यांना दाखवायचे असते. आमच्यात किती छान नातं आहे, आम्ही एकमेकांसोबत कसे परिपूर्ण दिसतो याचा डंका त्यांना पिटायचा असतो. तसे यात नेहमीच काही चूक नाही. नात्यात आल्यानंतर आपण एकमेकांसोबत खुश आहोत असे दाखवण्यासाठी एकमेकांसोबतचे फोटो अनेक कपल्स सोशल मीडियावर अपलोड करतात. आपल्या जोडीदारावरील प्रेम व्यक्त करण्याची त्यांची ही पद्धत असते.

एकमेकांना वेळ देणारे -
आपल्या जोडीदारासोबत प्रत्येकवेळी सोबत राहून त्यांच्यावर आपले किती प्रेम आहे हे प्रियकर आणि प्रेयसी एकमेकांना दाखवून देतात. शॉपिंगला एकत्र जाणे, सिनेमा पाहणे, प्रत्येक कार्यक्रमात एकमेकांसोबत जाऊन वेळ घालवणे. तसेच काहीजण सोबत फिरायला जाऊन रोमँटिक ट्रिप एन्जॉय करतात.
प्रेमात अनेक प्रकारे जोडीदार आपल्या पार्टनरला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात. आपले प्रेम दाखवण्यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारे रोमँटिक होऊन प्रेयसीला किंवा प्रियकराला खुश करतात. कधी अचानक सरप्राईज देऊन त्यांना थक्क करतील तर कधी त्यांच्या सौंदर्याची तारीफ करून जोडीदाराला मोहित करतील. यातील तुम्ही कोणत्या प्रकारचे रोमँटिक कपल आहात  किंवा कोणत्या प्रकारचे कपल तुम्हाला बनवायला आवडेल, हे कमेंट्स मध्ये लवकर सांगा