आज अचानक मला ती दिसली
पाहून मला ती गालात हसली
नंतर मात्र ऐकायेकी लाजली ||
विचारात जिच्या राहो मी मग्न
जीच्यापाई झालो होतो मी मनोरुग्ण
आता मात्र तीच झालं होत लग्न ||
ऐक माणूस तिच्यापाशी उभा होता बावरा
फुलाभोवती असते जसा भवरा
असावा बहुतेक तो तिचा नवरा ||
पाहता पाहता तिला मी मोजायचो आकाशातील पाखर
आता मात्र तीच बदलल होता सार चीतर
कारण आता त तिला झाले होते दोन लेकर ||
वाटल नव्हत की ती पुनः दिसेल
संसाराचा ओझ तिच्या खांद्यावर असेल
संसारात आहे आता ती गुंतली
नेहमीच पाहिजे आनंदात असली ||
या गोष्टींना आता नाही अर्थ
तिचा विचार करणे आता आहे व्यर्थ
दिवसा मागून दिवस जातील भराभर
तिची ऐक आठवण राहील आयुष्यभर ||

0 टिप्पण्या