कुणीतरी माझ्यावर प्रेम कराव...........

तिने हळूच माझ्याकडे बघाव.......

मी बघतांना तिने हळूच लाजाव......

 

भर पावसात मग तिच्यासोबत ओलचिंब व्हाव....

भर पावसात अलगद तिला मिठीत घ्याव..

 

मी दिसताच तिने मग हळूच हसाव...

आणि मी नसतांना तिने माझ्या आठवणीत रडाव....

तिला चीडवल्यावर तिने मुद्दाम रुसाव...

मग तिला मनवन्यासाठी,

 तिला सुंदर गुलाबाच फुलद्याव.......

तिच्या दिलाच्या प्रत्येक ठोक्याला,

माझच नाव निघाव....

स्वप्नातही तिला मीच दिसावं,

अस कधीतरी घडाव ....

कुणीतरी नक्कीच माझ्यावर प्रेम कराव.....